Pages

▼

Saturday, 25 July 2020

जुनी बाजारपेठ, लोणावळा येथे अजून एक जण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील 'जी' वॉर्ड जुन्या बाजारपेठत शुक्रवारी उशिरा एका ५२ व्यक्तीच्या करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे आता लोणावळा शहरातील एकूण करोना बधितांची संख्या ४७ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर रुग्णाला निमोनिया सारखी काही लक्षण दिसू लागल्याने ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्याठिकाणी त्यांचा स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता जुनी बाजारपेठ परिसरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. 

लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

गवळीवाडा  - ३
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी  - ४
भांगरवाडी  - ११
नांगरगाव  - ६
खंडाळा  - ९
वलवण  - २ 
गावठाण आणि बाजारपेठ, लोणावळा  - १०
रेल्वे विभाग  - २


1 comment:

  1. पहिले तर खूप खूप धन्यवाद तुम्ही कॉरोन संधारबात सूचना देत राहता !!

    माझ्या कडन एक छोटीशी विनंती कि जे लोक या आजार पासून बरे झाले आहेत त्यांची पन सूचना द्या !!

    एक लोणावळा रहिवाशी !!

    ReplyDelete