लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 10 July 2020

भांगरवाडी येथे आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण; ६० वर्षीय जेष्ठ महिलेला करोनाची लागण

लोणावळा शहरातील भांगरवाडी विभागात आज शुक्रवारी आणखी एक करोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे भांगरवाडी विभागात आता करोना रुग्ण संख्या दोन झाली आहे. आजच लोणावळा शहरातील नांगरगाव विभागातील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज आलेला हा तिसरा पॉझिटिव्ह अहवाल आहे. त्यामुळे लोणावळा शहरात आता एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १७ झाली आहे. यातील तीन रुग्णांची नोंद सध्या नवी मुंबई याठिकाणी घेतली गेली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार भांगरवाडी याठिकाणी ०८ जुलै रोजी एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कातील त्याची आई, पत्नी आणि मुलं अशा चार जणांचे स्वॅब हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून करोना चाचणी साठी घेण्यात आले होते. या चाचणी मध्ये संबंधित व्यक्तीच्या आईची चाचणी आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर तळेगाव येथील कोविड केअर सेन्टर मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे.  

मावळ तालुक्यात आज नवीन ८ करोना रुग्ण आढळून आले आहे. यात कामशेत येथे २, सुदुंबरे येथे १, कार्ला येथे १, मळवली येथे १, साई येथे २ तर लोणावळा येथील १ (लोणावळ्यातील २ रुग्णांची नोंद नवी मुंबई येथे करण्यात आली आहे) रुग्णाचा समावेश आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages