करोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील महिला करोना चाचणीत पॉझिटिव्ह; इतर आठ व्यक्तींची करोना चाचणी निगेटिव्ह
लोणावळा : लोणावळा शहरातील खंडाळा विभागात बुधवारी आढळून आलेल्या करोनाग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कात असलेल्या एकूण नऊ व्यक्तींचे नमुने करोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका ३२ वर्षीय महिलेची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने लोणावळा शहरातील करोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे.
संपूर्ण जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव धुमाकूळ घालत असताना लोणावळा शहर या रोगापासून दूर राहिले होते. मात्र बुधवारी लोणावळा शहरातील खंडाळा विभागात एक ७४ वर्षीय जेष्ठ नागरिक करोना संसर्गित आढळून आल्याने, संपूर्ण लोणावळ्यात खळबळ उडाली होती. नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी राहायला होता, त्याठिकाणी कंटेन्मेंट आणि बफर झोन जाहीर करून संसर्गित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या एकूण ९ जणांना करोना तपासणीसाठी तळेगाव येथील होर्टिकल्चर सेन्टर येथे पाठविण्यात आले आहे, तर अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या एकूण ७३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील ३० जणांना होम क्वारंटाईन तर ४३ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
खंडाळा विभागात संसर्गित आढळलेल्या पहिल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेला दुसरा रुग्ण हा पहिल्या रुग्णाच्या घरातीलच असल्याने बुधवारी जाहीर करण्यात आलेला खंडाळा विभागातील परिसरच कंटेन्मेंट क्षेत्रात कायम राहणार आहे. मात्र या सर्वात इतर ८ जणांचे करोना नमुने निगेटिव्ह आल्याची बातमी लोणावळेकरांसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक ठरली आहे.
मला फॉलो करा
Thanks for the update
ReplyDeleteThanks for update
ReplyDeleteThank for the update
ReplyDeleteThank you sir
ReplyDeleteThanks for update.
ReplyDeleteThanks
ReplyDeleteThanks for update
ReplyDeleteThank for update
ReplyDeleteThanks for update
ReplyDeletePlease update Lonavla news about Corona if any in future
ReplyDeleteDefinitely sir..
DeleteThanks for update beo
ReplyDeleteThanks Vishal
ReplyDeleteThanks for update
ReplyDeleteलोणावळा शहर करिता धोकादायक ....
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteThanks for the Update.Worried about the People of Khadala & Lonavla.Wish Everything gose Well with the Grace of God Almighty.Dhirubhai P.Tailor Kalyanji.
ReplyDelete