Pages

▼

Saturday, 20 June 2020

आयएनएस शिवाजी लोणावळा कॅम्पसमधील तीन प्रशिक्षणार्थी तरुण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा : लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या  भारतीय नौदलाच्या प्रशिक्षणार्थी कॅम्पसमधील तीन प्रशिक्षणार्थी तरुणांचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

सदर तीनही तरुण २० वर्ष वयाचे असून मूळ मथुरा, उत्तर प्रदेश येथील ते निवासी आहेत. प्रशिक्षणासाठी ते दिनांक १० जून रोजी आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्ये आले होते. त्यानंतर त्यांना आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्येच क्वारंटाईन करण्यात आले होते. शुक्रवारी दिनांक १९ जून रोजी त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने संबंधित प्रमुखांनी त्यांना कोंढवा येथील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. तेथे तपासणी केली असता त्यांचे अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आलेले आहेत.




No comments:

Post a Comment