Pages

▼

Sunday, 14 June 2020

राजमाचीकरांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार ; रोटरी क्लब ऑफ लोणावळाचा उपक्रम

'निसर्ग' चक्रीवादळाने तडाखा दिलेल्या राजमाची या गावातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट पुढील काही दिवसात थांबणार आहे. रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांनी ही जबाबदारी उचलली असल्याचे रोटरीचे अध्यक्ष उदयसिंग पाटील यांनी सांगितले आहे.

शनिवारी दिनांक १३ जून रोजी रोटरी क्लब ऑफ लोणावळा आणि क्लब महिंद्रा, तुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या ताजे-पिंपलोळी आणि राजमाची जवळील फणसराई, वनाटी या गावातील ६० परिवारांना कोरडा शिधा (किराणा किट) चे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष उदयसिंग पाटील, क्लब महिंद्रा चे व्यवस्थापक बिपलाप बँनर्जी, चौधरी, जयवंत नलावडे, आशिष मेहता, शाम पवार, राजेश गायकवाड, विकास तारे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

राजमाची या गावात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असून येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करीत अर्धा राजमाची गड वर चढून जावा लागतो, किंवा एक किलोमीटर दूर डोंगर उतरून एका विहिरीवर पाण्यासाठी जावं लागतं. त्यावर उपाय म्हणून याच विहिरीमधील पाणी डिझेल पंपाच्या मदतीने वर गावात आणून त्याठिकाणी एका टाकीत हे पाणी सोडल्यास ग्रामस्थांची पायपीट थांबले, हे लक्षात घेऊन रोटरी क्लबने पुरेशा क्षमतेने पाणी खेचनारा आणि आणि पुढे ढकलनारा डिझेल पंप पुढील चार ते पाच दिवसात राजमाची गावासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलं आहे. यावर राजमाची ग्रामस्थांनी रोटरी क्लबचे आभार मानले आहे.




No comments:

Post a Comment