आंदर मावळात डोंगरदाऱ्यांमध्ये वसलेल्या डाहुली गावात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला पळवून नेले. गावातील एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा बिबट्या आढळून आला आहे.
डाहुली परिसरात पुण्यातील एका डॉक्टरांचा बंगला असून सध्या तो बंद आहे. या बंगल्याच्या बाहेर एक पाळीव कुत्रा बंगल्याची राखण करत असतो. बंगला मालक आल्यानंतर त्यांना तो कुत्रा कुठेच दिसला नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी देखील केली मात्र कुत्रा काही सापडला नाही. त्यानंतर त्यांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला नेल्याचे दिसून आले. डहुली गावचे रहिवासी सुरेश पांडुरंग पिंगळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
यापूर्वी देखील डाहुली गावात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे प्रकार घडला होता. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागास माहिती देऊन बिबट्याला पकडण्याची मागणी केली होती. परंतु बिबट्याचा वावर गावाच्या हद्दीत नसून वनक्षेत्रात असल्याने वनविभागाने बिबट्यास पकडले नाही. मात्र डाहुली गावात पुन्हा बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिक घराबाहेर फिरण्यास घाबरू लागले असून या बिबट्याला वनविभागाने तातडीने पकडावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
मला फॉलो करा
No comments:
Post a Comment