लोणावळा येथील नांगरगाव परिसरतील आणखी एका महिलेचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नांगरगाव परिसरातील करोना बधितांची संख्या आता १० झाली आहे तर लोणावळा शहरातील एकूण रुग्ण संख्या १७ झाली आहे. त्यात सध्या १३ रुग्ण हे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर ३० वर्षीय महिला ही नांगरगाव येथील एका कंपनीत आढळलेल्या करोना बधिताची पत्नी आहे. या महिलेचा पतीला याच कंपनीमध्ये सर्वप्रथम आढळून आलेल्या करोना बाधित कामगाराच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली होती.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा
No comments:
Post a Comment