लोणावळा शहरातील कल्पतरू या नामांकित रुग्णालयाच्या एका ४० वर्षीय डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरने एका खाजगी लॅब मध्ये स्वतःची करोना चाचणी करून घेतली असता त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित डॉक्टर हे कामशेत याठिकाणी गेले असता तेथील एका पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली. कोणतेही लक्षण दिसत नसली तरी थोडी शंका आल्याने तात्काळ मागील काही दिवसांपासून संबंधित डॉक्टरने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले असल्याने सध्यातरी कोणालाही हाय रिस्क म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. मात्र प्रशासनाने कल्पतरू हे हॉस्पिटल पूर्णपणे सॅनेटाईज करून घेतले आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletePlease tell the name
ReplyDelete