Pages

▼

Monday, 27 July 2020

टेबल लँड, 'जी' वॉर्ड, लोणावळा येथे एक जण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील टेबल लँड, 'जी' वॉर्ड, विभागातील एक ४८ व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरातील आता एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहरातील चार जणांचे स्वॅब शनिवारी कोविड चाचणी साठी कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी घेण्यात आले होते. त्यातील तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह तर एकाच अहवाल आज सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. लोणावळा शहरात आतापर्यंत ४८ पैकी सक्रिय रुग्णांची संख्या ही २५ असून २० जणांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


No comments:

Post a Comment