लोणावळेकरांसाठी आज गुरुवारचा दिलासादायक असा ठरला आहे. मागील सलग काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या करोना बाधित रुग्णसंख्येत आज गुरुवारी खंड पडला आहे. आजच्या दिवशी लोणावळा शहरात एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. शिवाय कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी घेण्यात आलेल्या २८ जणांच्या स्वॅबचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहे.
लोणावळा शहरात काल बुधवारी एकाच दिवशी ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यातील ४ रुग्णांचे अहवाल हे बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्याने त्याचे वृत्तांकन आज गुरुवारी सकाळी करण्यात आले होते. मात्र हे वगळता आज शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.
लोणावळा शहरात आज अखेर एकूण करोना बाधित रुग्ण संख्या ही ४४ इतकी झालेली आहे. यातील पूर्णतः बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही आजअखेर १३ इतकी असून मृत रुग्णांची संख्या ३ आहे. तर आजमितीला शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २८ इतकी आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ३
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४
भांगरवाडी - ११
नांगरगाव - ६
खंडाळा - ९
वलवण - २
गावठाण आणि बाजारपेठ, लोणावळा - ८
रेल्वे विभाग - १
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा
Please send me Link Lonavala news update on my what's app no. 9673315459.
ReplyDeleteGood job vishal Bhau update dilya vassal dhanyawad
DeleteGood job vishal Bhau update dilya baddal dhanyawad
Deleteधन्यवाद
DeleteVishal Bhau ashirwad hospital madhe kahi zhalay kA..
ReplyDeleteमाझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत तरी काही नाही
Deletekhandala madi 9 postive rugna kute ahe
ReplyDeleteकेळ पेठेत तीन, रस्टीक हायलँड मध्ये चार आणि सर्वात आधी बरे झालेलं दोन असे एकूण नऊ
Delete