Pages

▼

Sunday, 12 July 2020

नांगरगावच्या त्या कंपनीमध्ये कामाला असलेला गवळीवाडा विभागातील एक जण पॉझिटिव्ह

लोणावळा येथील नांगरगाव औद्योगिक वसाहती मधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणखी एका २९ वर्षीय व्यक्तीचा करोना अहवाल आज सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती ही गवळीवाडा विभागात राहणारी असून नगरपरिषदेने संबंधित व्यक्तीला मागील काही दिवसांपासून संस्थात्मक क्वारंनटाईन केलेलं आहे. याशिवाय या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ४ जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून क्वारंनटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब चाचणी साठी घेण्यात येणार आहे.

प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणारी एक व्यक्ती ७ जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर सदर कंपनी मधील या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आता याच कंपनीमधील आणखी एका कामगाराचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणि करोना पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांची संख्या चार झाली आहे. 

No comments:

Post a Comment