लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून करोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाकडून सोमवारी मध्यरात्री पासून सात दिवस लॉकडाऊन घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव मावळ मुळशी प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याचे लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी रवि पवार यांनी सांगितले आहे. लवकरच यासंदर्भातील आदेश प्रांत अधिकारी यांच्याकडून प्राप्त होईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.
मुख्याधिकारी यांनी दिलेल्या महितीमधील काही महत्त्वाचे मुद्दे
🔶 पल्स ऑक्सिमिटरच्या मदतीने शहरातील नागरिकांची तपासणी करणार. त्यात ऑक्सिजन लेव्हल ९० पेक्षा कमी दिसल्यास तात्काळ खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात कोविड चाचणी करून घेण्याचा मुख्याधिकारी यांचा सल्ला
🔶 नगरपरिषदे कडून १४ भरारी पथकांची स्थापना. सोशल डिस्टनसिंग न पाळणारे, मास्क न वापरणारे तसेच ज्यांचे शहरात घर नाही मात्र येथे सहज म्हणून फिरायला आलेले तसेच बाजारपेठेत फिरणारे यांच्या विरोधात धडक कारवाई मोहीम सुरू. शुक्रवारी एकाच दिवसात ६४ जणांकडून ३२ हजार रुपयांचा दंड वसूल
🔶 शहरातील भाजीवाले, दूधवाले, पेपर टाकणारे, सर्व्हिस बॉय अशा सर्वांच्या रॅपिड टेस्ट करणार असल्याची माहिती देत या रॅपिड टेस्ट मध्ये जे पॉझिटिव्ह सापडतील त्या सर्वांच्या सरसकट कोविड-१९ टेस्ट केल्या जाणार.
🔶 लोणावळा शहरात सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील सात दिवस पूर्णतः लॉकडाऊन करण्याबाबत प्रांत अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर.
🔶 लॉकडाऊन दरम्यानचे पाहिले चार दिवस फक्त औषध दुकानं, दूध विक्री केंद्र आणि हॉस्पिटल सुरू ठेवण्यात येणार असून चार दिवसांच्या नंतर किराणा मालाच्या दुकानांना दोन ते तीन तासांची मुभा देण्यात येणार
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा
No comments:
Post a Comment