Pages

▼

Thursday, 16 July 2020

खंडाळ्यातील रस्टीक हायलँड परिसरात आणखी एक करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील खंडाळा विभागातील रस्टीक हायलँड परिसरात आज गुरुवारी एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने खंडाळ्यातील सक्रिय करोना बधितांची संख्या आता २ झाली आहे. काल बुधवारीच खंडाळ्यातील केळपेठ येथे एक ५८ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आता लोणावळा शहरातील एकूण करोना बधितांची संख्या २० झाली आहे. तर इतर ४ रुग्णांची नोंद ही नवी मुंबई येथे घेण्यात आलेली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार रस्टीक हायलँड येथील सदर करोना बाधित व्यक्ती ही ३१ वर्षीय आहे. ही व्यक्ती सोमटणे फाटा याठिकाणी स्पर्श हॉस्पिटलमध्ये आपल्या आजारपणावर उपचार घेण्यासाठी ऍडमिट होती. त्याठिकाणी त्यांची कोविड चाचणी घेण्यात आली असता, आज गुरुवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर रस्टीक हायलँडचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. 



No comments:

Post a Comment