लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 14 July 2020

लोणावळा शहरातील इराणी चाळ परिसरात एक करोना पॉझिटिव्ह; शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२

लोणावळा शहरात आज मंगळवारी इराणी चाळ, गावठाण परिसरात एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आलेली आहे. याशिवाय लोणावळा ग्रामीण परिसरात आज ४ जण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले असून यातील ३ जण टाकवे खुर्द येथील तर १ जण भाजे गावातील रहिवासी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह अहवाल आलेली महिला रुग्ण ही ५५ वर्षीय असून लोणावळा शहरातील इराणी चाळ परिसरात राहणारी आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून आजारी असल्याने तळेगाव येथील मायमर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या या महिलेचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आले होते. संबंधित बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना प्रशासनाकडून हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात येणार आहे. आज सापडलेल्या या रुग्णामुळे लोणावळा शहरातील आता एकूण करोना बाधित रुग्ण संख्या २२ झाली आहे. आतापर्यंत यातील ७ रुग्णांचे करोना अहवाल निगेटिव्ह आलेले असल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजमितीला लोणावळा शहरातील सक्रीय रुग्ण संख्या १३ इतकी आहे. यातील चार रुग्णांची नोंद वाशी, नवी मुंबई याठिकाणी तर दोन रुग्णांची नोंद सोमटणे फाटा याठिकाणी करण्यात आलेली आहे.

संपूर्ण मावळ तालुक्यात आज एकूण १९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात शहरी भागातील ८ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. शहरी भागात वडगाव येथे १, तळेगाव येथे ६ तर लोणावळा शहरात १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ग्रामीण भागात कामशेत येथे ०२, भाजे येथे १, सोमाटणे येथे २, सुदुंबरे येथे १, सुदवडी येथे १, वराळे येथे एक तर टाकवे खुर्द येथील ३ जणांचा समावेश आहे. आज अखेर मावळ तालुक्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५५ झाली आहे. यातील सक्रिय रुग्ण संख्या १५९ इतकी असून आतापर्यंत ८७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


माझे ब्लॉग फॉलो करण्यासाठी



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages