मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कार्ला फाट्यावरील टाकवे खुर्द येथील भाजीपाला विक्रेत्याचा १० जुलै रोजी कोरोना अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता. त्याच्याच कुटुंबातील आणखी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
सदर भाजीपाला विक्रेत्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारातील व्यक्तींचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून कोविड केअर सेंटर, लोणावळा येथे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात त्याचा ३७ वर्षीय मुलगा, ५० वर्षीय पत्नी व ३२ वर्षीय सून अशा एकूण तीन जनांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्वांवर तळेगाव येथील जनरल हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून आणखी सहा जणांच्या स्वॅब हे लोणावळा कोविड सेंटर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती कार्ला आरोग्य आधिकारी डाॅ. भारती पोळ, आरोग्य सेवक प्रसाद बिराजदार,शिवाजी चव्हाण,चंद्रकांत गवलवाड यांनी दिली.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment