लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 24 May 2020

लोणावळा, हुडको परिसरातील संशयताची चाचणी देखील निगेटिव्ह

लोणावळेकरांना एकाच दिवसात दुसरी दिलासादायक बातमी



लोणावळा शहरातील हुडको, सह्याद्री नगर, विभागातील एक संशयितांचे स्वॅब गुरुवारी करोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या चाचणीचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते देखील निगेटिव्ह आले आहे. काही वेळापूर्वीच भांगरवाडी विभागातील एका संशयिताची चाचणी निगेटिव्ह आली होती, त्यानंतर काही वेळातच आता दुसरी चाचणी देखील निगेटिव्ह आल्याने कोणीही घाबरून जाऊ नये, तसेच कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आतापर्यंत लोणावळा शहरातील एकूण ११ संशयित रुग्णांचे स्वॅब करोना चाचणी साठी पाठवण्यात आले असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले आहेत. ही बातमी लोणावळेकर नागरिकांसाठी निच्छितच दिलासादायक असली तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे.

लोणावळा शहरात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन सर्वतो काळजी घेत आहे. मात्र याला लोणावळेकर नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित आहे. नागरिकांनी करोना संदर्भात देण्यात आलेल्या शासकीय निर्देशांचे काटेकोर पालन करावे. घराच्या बाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करावा, तसेच सार्वजनिक ठिकाणं, बाजारपेठ, लग्नकार्य, अंत्यविधी आदी गर्दीची ठिकाण टाळून, जास्तीत जास्त सोशल डिस्टनसिंगचे पालन करावं. सोबतच लोणावळेकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही तथ्यहीन अफवांना बळी न पडता, खात्री करून घेतल्याशिवाय अशा अफवा पुढं पसरवू नये. 

      मुख्याधिकारी,                नगराध्यक्षा
लोणावळा नगरपरिषद      लोणावळा नगरपरिषद

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages