लोणावळा : पर्यटननगरी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना येथील टायगर पॉईंटच्या खोल दरीच्या वर हवेत चालण्याचा फील लवकरच अनुभवण्यासाठी मिळणार आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लोणावळा शहरातील टायगर पॉइंट याठिकाणी स्कायवॉक उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे लवकरच हा प्रस्तावित स्कायवॉक येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण ठरणार आहे.
स्कायवॉक उभारण्याच्या या घोषणेचे स्वागत लोणावळा शहरातील नागरिक, व्यावसायिक तसेच ट्रेकर्स संस्थांकडून करण्यात आले. टायगर पॉईंट हा मुख्य शहरापासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. येथील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटन त्याठिकाणी जात असतात. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या या पॉईंटवर वन विभागाच्या वतीने काही सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत, मात्र तुलनेत त्या खूपच नगण्य अशा आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात याठिकाणी स्कायवॉक सोबतच इतर सुविधा देखील तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निच्छितच मोठी वाढ होणार असून त्याचा फायदा लोणावळा शहराच्या एकूण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक असाच होणार असल्याच्या प्रतिक्रिया येथील स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
लोणावळा शहरातील एक सर्वात मोठी ट्रेकिंग संस्था असलेल्या शिवदुर्ग मित्रचे सुनील गायकवाड यांनी वरील निर्णयावर समाधान व्यक्त केले असून या स्कायवॉक प्रोजेक्ट मुळे याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक प्राथमिक सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कसा असणार आहे हा 'स्कायवॉक'
साधारण पणे 15 फूट लांब आणि 8 फूट रुंद असा एक काचेचा रॅम्प टायगर पॉईंटला जोडून दरीच्या दिशेने बाहेर उभारण्यात येणार आहे. जेणेकरून येणार पर्यटक या पारदर्शक काचेच्या रॅम्पवर चालत जाईल, जेणेकरून त्याला अक्षरशः आपण खोल दरीच्या वर हवेत चालत जात असल्याची फिलिंग मिळेल. या प्रोजेक्ट साठी साधारण सात ते साडेसात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे संगण्यात येत आहे.
लोणावळा नागरपरिषदेच्या रोप वे चे काय? लोणावळेकरांचा प्रश्न
एकीकडे टायगर पॉईंट स्कायवॉक साठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत असताना लोणावळ्यातील मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रोप वे चे काय झालं हा प्रश्न लोणावळेकर नागरीक उपस्थित करीत आहेत. अनेक वर्षे केवळ कागदावर असलेल्या या प्रस्तावित रोपवे साठी आवश्यक असलेली दरीच्या एका बाजूकडील शासकीय गायराणाची जागा लोणावळा नागरपरिषदेने महाराष्ट्र शासनाकडे करोडो रुपये भरून खरेदी केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला नागरपरिषदेच्याच ताब्यात असलेल्या जागेवर वनखात्याने आपला हक्क सांगितल्याने नगरपरिषदेला ह प्रोजेक्ट घेऊन पुढं जाता येईना. त्यामुळे शासनाने नवनवे प्रोजेक्ट हाती घेत असतानाच आधी हाती घेतलेले आणि अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करावे अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

ReplyDeleteSkywalk हा एक निव्वळ निवडणूक स्टंट आहे ..
एकीकडे टायगर पॉईंट स्कायवॉक साठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत असताना लोणावळ्यातील मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशात करण्याचे बंधन असलेल्या Devlopment Plan Digitization च काय??
माननीय उच्च न्यायालयाने नेमलेल्या समिती कडून ह्या प्रकल्पाची मान्यता मिळालाय आहे काय?
ह्याला environmental clearence मिळाला आहे काय??
हा एक निव्वळ निवडणूक स्टंट आहे ..नगरपालिका निवडणूक लक्षात ठेऊन केलेली घोषणाबाजी च्यांपालिकडे काही नाही.
शहरात राहत असलेल्या मूळ जाणते साठी मूलभूत सुविधांचा अभाव आणि पर्यटकांची फक्त सोय...
शहरात सध्या स्वतः चे नगरपालिकेचे एकही अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण केंद्र , सार्वजनिक स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स, किंवा एक ही चांगली नाट्यगृह अथवा प्रेक्षकगृह नाही जे स्थानिकांसाठी गरजेचे आहे...
प्रत्येक वेळेस पर्यटक पर्यटनाच्या नावांनी स्थानिक वर गर्दी आणि सुविधेचा बोजा लादला जातो. स्थानिक नागरिकांसाठी कुठले चांगले उपक्रम घेण्यात येत नाही... काही संस्था बरेच गोष्टी साठी धडपडतात.. आयकार्ड पासून निधी आणि जागे अभावी उत्तम खेळाडूंना लोणावळ्या बाहेर जाव लागते . क्रिकेट कीव मैदानी क्रीडांगण साठी रेल्वे वर अवलंबून राहवे लागते
.. हे स्थानिकांच्या लक्षात येत नाही...
फक्त रस्ते दिवा बत्ती आणि गटर म्हणजे सर्व काही आहे का?? ती तर मूलभूत हक्क आहे ज्याचा टॅक्स नगरपालिका घेते.
त्या पलीकडे जाऊन स्थानिकांनी आपल्या पुढील पिढी साठी उच्च दर्जाच्या सोयी सुविधा क्रीडांगण, बंदिस्त इनडोअर स्टेडियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नाट्यगृह, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक उद्यानाचा विकास आणि व्यवस्थापन ह्या वर का मागणी होत नाही?
शहराची बकाल अवस्था आपल्या मुळेच आहे..कारणीभूत आपणच आहोत......ती दूर करण्यासाठी साठी बाहेरून कोण येणार आणि आपल्याला तत्वज्ञान देणार..
आपणच आहोत आपल्या अव्यवस्थेचे जवाबदार नागरिक..
दूरदृष्टीने विचार करा नाही तर भविष्यात आपले अस्तित्व इतर महागरपलिका ठरवतील ...किंवा आपाल्याला इतर महानगरपालिकेचा भाग म्हणून जोडले जाईल...
स्काय वॉक ची गरज स्थानिकांना खरंच आहे का?
Ar.Mahesh Bhusari
Jt Hon Secratary
Indian Institute of Architects Lonavala Centre