लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महिला दिन साजरा
लोणावळा : लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांना प्रतिकात्मक स्वरूपात पोलीस स्टेशन प्रभारी प्रमुख होण्याचा सन्मान देण्यात आला. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी ही सूत्र शिंदे यांच्याकडे सोपवून त्यांचा आणि इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लतीफ मुजावर, सहा. फौजदार सदाशिव पिरगणवर, पो. हवा. घोटकर, प्रविणकुमार गोसावी, सागर धनवे, सोनाली जगधने आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील महिला कर्मचारी तसेच महिला तक्रारदार यांचा जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. पो.नि. मोरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिला दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश सांगितला. संसाराचा गाडा ओढत असताना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी काम करतात. एकाच वेळी अशा वेगवेगळ्या आव्हानात्मक भुमिका समर्थपणे सांभाळणाऱ्या या रणरागिणी खऱ्या अर्थाने योध्या असल्याचे पो.नि. मोरे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment