भारतात आज संध्याकाळ पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १.७३ लाख इतकी झाली आहे, तर ४,९७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ८२,३७० इतकी लोकं करोना मधून बरी झाली आहे. थोडक्यात भारतात करोना झालेल्यांचे मृत्यूचे प्रमाण हे २.८६% इतके तर करोना आजारामधून बरे झालेल्यांचे प्रमाण हे ४७.४०% इतकं आहे.
भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ६२,२२८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर मृतांचा आकडा २०९८ इतका झाला आहे. तर आतापर्यंत २६,९९७ इतकी लोकं करोना मधून बरी झाली आहे. या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात करोना मुळे मृत्यूचे प्रमाण हे ३.३७% इतके तर करोना आजारामधून बरे झालेल्यांचे प्रमाण हे ४३.३८% इतकं आहे.
करोना विषाणू हे प्रकरण नक्की काय आहे?
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
हा नव्या प्रकारचा विषाणू श्वसन यंत्रणेवर हल्ला चढवतो. याच आजाराला COVID-19 असे म्हणतात. या विषाणूची लागण झाल्यानंतर मानवांमध्ये सामान्य सर्दी, श्वसनाचे विकास किंवा श्वसनाचा त्रास जाणवू शकतो.
COVID-19 ची लक्षणं काय आहेत?
🔸ताप किंवा थंडी वाजणे
🔸थरथरणे
🔸स्नायूंमध्ये दुखणे
🔸डोकेदुखी
🔸खोकला किंवा घसा खवखवणे
🔸चव न कळणे किंवा वास न येणे
ही अतिशय सामान्य अशी लक्षणं असतात आणि ती हळूहळू वाढत जातात. बहुतेकदा करोना लागण झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणं अतिशय सामान्य असतात. मात्र एकुणात ५ ते १५ टक्के रुग्णांमध्ये ती तीव्र स्वरुपाची देखील असू शकतात. ही लक्षणं दिसायला कधी पाच दिवस लागू शकतात तर कधी त्याहून जास्त. जागतिक आरोग्य संघटच्या अनुमानानुसार हा व्हायरस आपले परिणाम शरीरात दाखवण्यास १४ दिवससुद्धा घेऊ शकतो.
करोना विषाणू किती प्राणघातक आहे?
करोना विषाणू हा प्राणघातक आहे. लागण झालेल्यांपैकी २ ते ३ टक्के रुग्णांना प्राण गमवावा लागतो, असा एक अंदाज आहे. मात्र वरील आकडेवारी बघता करोना मुळे जागतिक मृत्यूचे प्रमाण हे साधारण ६% आहे तर भारतात हे प्रमाण २% ते ४% इतकं आहे.
करोना विषाणू संसर्गजन्य आहे का? आणि तो कसा पसरतो?
करोना विषाणू हा संसर्गजन्य आहे. तो माणसाकडून माणसाकडे पसरू शकतो. करोना लागण झालेला रुग्ण शिंकला किंवा खोकला तर त्यांच्या संपर्कात असलेल्याला त्यांचा संसर्ग होतो. दूषित जागेवरूनही तो पसरू शकतो.
करोना विषाणू हवेत तसेच पृष्ठभागावर किती काळ राहतो?
हवेत किंवा एखाद्या दूषित पृष्ठभागावर करोना विषाणू काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतही राहू शकतो.
करोनावर काय उपचार आहे?
सध्या तरी जगात करोनाशी लढण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही. बाधित रुग्णांना त्यांच्या लक्षणांच्या आधारे औषधे दिली जात आहेत. रोगप्रतिकार शक्ती चांगली असणाऱ्या व्यक्ती विषाणूंशी सामना करून बऱ्या होतात.
काय सावधगिरी बाळगावी?
🔸खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंडाला रुमालाने झाकावे. ज्यांना सर्दी किंवा फ्ल्यू असेल अशांशी जवळून संपर्क साधू नये. थोडक्यात आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका.
🔸साबणाने नियमित हात धुवावे. हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नये.
🔸शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवावे.
🔸गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
🔸सार्वजनिक स्थळे, सर्वाजनिक वाहतूक व्यवस्थेच्या साधनांमधील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका किंवा हात मिळवू नका
मास्क वापरल्यामुळे खरंच कोरोना रोखता येता का, याबाबत अजूनही साशंकता आहे. मात्र तरीही सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर विषाणू पसरू नयेत यासाठी मास्क वापरला जातो. मात्र हा मास्क वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. वापरलेले मास्क कुठेही टाकले, फेकले तर ती गोळा करणाऱ्यांना विषाणूची लागण होऊ शकते. या पेक्षा साधा रुमाल नाकाला बांधला आणि वापरानंतर गरम पाण्याने धुवून स्वच्छ करणे योग्य आहे. एन- ९५ हे मास्क फक्त वैद्यकीय सेवा देणाऱ्यांसाठीच आहेत.
काही ठिकाणी रोगाचं निदान करण्याची पुरेशी व्यवस्था नाही तर काही दुसऱ्या ठिकाणी लक्षणं दिसत नसल्यामुळे रुग्णांची ओळखच पटत नाहीय. मात्र ज्यांना आधीच दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखा कुठला ना कुठला आजार आहे त्यांना या रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता आहे.


No comments:
Post a Comment