Pages

▼

Sunday, 24 May 2020

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प एक सुखद अनुभव

          सिमेंटच्या जंगलातून नैसर्गिक जंगलाकडे


आपल्या प्रगत मानवजातीला सिमेंटच्या जंगलात राहण्याची सवयच होऊन गेलीय. पण कधीकधी या कृत्रिम जगाचा आपल्याला उबग येतो आणि मन धावू लागते ते निसर्गाकडे. उत्क्रांती, प्रगती याच्या नावाखाली ज्या निसर्गाकडे आपण पाठ फिरवली, खरंतर त्याच निसर्गाच्या सानिध्यात, त्याच्या साथीने आणि त्याच्याच आधाराने आपल्या मानवाची उत्क्रांती झाली. पण मानवाची ही उत्क्रांती निसर्गाच्याच मुळावर आली. निसर्गाने भरभरून दिलेली जंगल संपत्तीचा आपण समूळ विनाश केलाय, असं म्हंटल तरी वावग ठरणार नाही. 

समूळ विनाशाच्या दिशेने वाटचाल करणारा हा अभागी निसर्ग, एकीकडे आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत असतानाच, जो त्याच्या अस्तीत्वावर घाला घालायला निघाला आहे, त्याच मानवी जीवाला सुखाचे काही क्षण जगण्यासाठी बहाल करीत आहे. निसर्गाच्या सानिध्यात मिळालेलं हे जे काही क्षण आहेत ना, ते क्षणच आपल्याला आपलं पुढील खडतर आयुष्य जगण्याची नवी उमेद देऊन जातात. 

डोळे उघडून नीट बघितले तर आपल्या आजूबाजूला निसर्गाची किमया आपल्याला निच्छितच बघायला मिळते. पण कधीकधी त्याहून वेगळं काही अनुभवायची आपल्याला इच्छा असते. पण त्यासाठी नक्की कुठं जावं हा  सर्वात मोठा प्रश्न असतो. मी सहजच युट्यूब वर काही व्हिडीओ बघत असताना मला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वर आधारित एक व्हिडिओ बघायला मिळाला. खूपच छान वाटला, मनाला अक्षरशः भावला, असं म्हणायला ही हरकत नाही. हा व्हिडीओ बघितल्यावर ताडोबा येथे पर्यटनाला जाण्याची एक उत्कट इच्छा मनात जागृत झाली. आपण सर्वांनी देखील हा व्हिडीओ बघावा, यासाठी या व्हिडीओ ची लिंक सोबत दिली आहे. आपण ती निच्छित बघाल ही अपेक्षा आहे. 


धन्यवाद
विशाल पाडाळे

No comments:

Post a Comment