Pages

▼

Tuesday, 16 June 2020

ओंकार तरुण मंडळामुळे अंधाऱ्या झोपड्यांमध्ये प्रकाशाचा दिवा

आयुष्याच्या पाचवीला पूजलेलं चारी विश्व दारिद्र्य आणि त्यात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने होत्याचे न्हवतं करीत उडविलेली दाणादाण. त्यामुळे अगदी जेरीस आणलेल्या फणसराई आणि वनाटी येथील आदिवासी कुटुंबाच्या अंधाऱ्या झोपड्या प्रकाशमान करण्याचे कार्य तुंगार्ली येथील ओंकार तरुण मंडळ या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं. 
३ जून रोजी झालेल्या चक्रीवादळाने लोणावळा शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात वसलेल्या राजमाची आणि परिसराला चांगलाच तडाखा दिला. अनेकांची घर यात होत्याची न्हवती झाली तर अनेकांच्या घरांची छपरे वाऱ्यासोबत गायब झाली. काही आदिवासींच्या झोपड्या तर अक्षरशः पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेल्या. अशामध्ये या आदिवासी लोकांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढं येत असताना तुंगार्ली गावातील समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या ओंकार तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील या आदिवासींच्या मदतीसाठी आपले हात पुढे केले.
ओंकार तरुण मंडळाच्या वतीनं फणसराई आणि वनाटी येथील सर्व कुटुंबांना सोलारवर चालणारे आणि मोबाईल चार्ज करणारे दिवे देण्यात आले. यामुळे या आदिवासी कुटुंबांना रात्रीच्या अंधारात रॉकेलचे दिवे सांभाळत उजेडासाठी करावी लागणारी धडपड बंद झाली. सोबतच या प्रत्येक कुटुंबाला धान्याचे किट, दोन ब्लँकेटचे आणि लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धनकवडे, मंडळाचे सदस्य नगरसेवक राजू बच्चे, जयंत गोसावी, ज्ञानेश्वर येवले, किशोर पवार, सतीश गावडे, किरण येवले, हरीलाल बोरकर, सुनील अंबुरे, नितीन गायकवाड, विजय येवले, प्रसाद मावकर, विशाल पाडाळे, मयूर बोरकर, रमेश शर्मा, शुभम गावडे, चिकने, हेमंत बनकर, धनंजय होन्नगी, विशाल केदारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment