Pages

▼

Tuesday, 16 June 2020

करोनामुळे लोणावळा शहरातील एका महिलेचा मृत्यू


लोणावळ्यात वलवण विभागातील एक ५६ वर्षीय महिलेचा करोनाची लागण झाल्यानं आज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सदर महिलेच्या संपर्कात असलेल्या तीन जणांचे स्वॅब करोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे, मात्र या तीनही जणांना कोणत्याही प्रकारची लक्षण अद्याप पर्यंत दिसून आलेली नाही. 


मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेवर कॅन्सर या रोगाचे उपचार सूरु होते. सदर महिला १ जुन रोजी दुबई येथून विमानाद्वारे गोवा येथे आली, त्यानंतर गोवा येथून वैयक्तिक वाहनाने त्या २ जूनला लोणावळ्यातील त्यांच्या स्वतःच्या घरी आल्या. तद्नंतर १२ जून पर्यंत त्या स्वतःच्याच घरी होम क्वारंनटाईन होत्या. मात्र १२ जूनला रात्री या महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने १३ जून पहाटे वायसीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घेण्यात आलेली त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यातच आज १६ जून दुपारी सव्वा एक वाजता सदर महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं वलवण गावाचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र तसेच बफर झोन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

2 comments:

  1. एक जून रोजी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होती का ?

    ReplyDelete
    Replies
    1. जी माहिती आम्हाला अधिकृत सरकारी सूत्रांकडून मिळाली, त्या आधारे आम्ही माहिती प्रसिद्ध केलीय

      Delete