लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 6 June 2020

बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मळवली येथील पाटण गावाच्या हद्दीमध्ये लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तुल बेकायदेशीर रित्या जवळ बाळगणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीला पोलिसांनी जेरबंद केलं.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराजसिंग दोहारे (वय 30, रा. रामपुरा मध्य प्रदेश सध्या रा. पाटण, मळवली) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाराजसिंग दोहारे हा स्वतःजवळ बेकायदेशीर पिस्तूल बाळगून असल्याची खबर गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली ल पो.नि. संदीप घोरपडे, स.पो.नि. रणवरे, पो.हवा लबडे, युवराज बनसोडे, पो.ना. अमित ठोसर, पो.शि.शरद जाधवर, संदीप बोराडे यांनी सापळा रचित महाराजसिंग दोहारे याला जेरबंद करीत त्याच्या कमरेला लावलेलं पिस्तूल जप्त केले. याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.अमित ठोसर करीत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages