मावळ तालुक्यात अनेक दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत असून लोणावळा ग्रामीण भागातील टाकवे खुर्द येथे एक ५५ वर्ष वयाच्या व्यक्तीचा करोना अहवाल आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. कार्ला परिसरातील वेहरगाव, शिलाटणे यानंतर आज टाकवे येथे आढळून आलेला हा तिसरा रुग्ण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर बाधित व्यक्तीचे कार्ला फाटा येथे भाजीपाला दुकान आहे. मात्र यामुळेच आता कार्ला परिसरात काही प्रमाणात भितीचे वातावरण तयार झाले आहे. संबंधित करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील नऊ जणांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी करोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीनं टाकवे खुर्द येथे प्रतिबंधित क्षेत्र तर फांगणे येथे बफर झोन जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसिलदार मधुसधन बर्गे, मावळ तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, कार्ला आरोग्य अधिकारी भारती पोळ यांनी दिली.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment