लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 13 July 2020

नांगरगाव येथील कंपणीमधील अजून एक जण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील नांगरगाव औद्योगिक वसाहती मधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणखी एक कामगाराचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळीच याच कंपनीमधील एका कामगाराचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आज पॉझिटिव्ह आलेला हा दुसरा कामगार असून आतापर्यंत या कंपनीत काम करणाऱ्या किंवा संबंधित असलेल्या करोना बधितांची संख्या ६ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेला कामगार हा लोणावळा ग्रामीण परिसरातील देवले गावच्या हद्दीमधील रहिवासी आहे. त्याचे वय २९ वर्ष आहे.  प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणारी एक व्यक्ती ७ जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर या कंपनीमध्ये करोना बधितांची एकप्रकारे साखळी तयार झाली असून येथे दर एक दोन दिवसांनी करोना लागण झालेला कोणी ना कोणी मिळून येत आहे. 


2 comments:

  1. Why Local corporate authorities ignoring!? Why not asking this organization to hold operations for few days..!! It shows how irresponsible LMC and Privi life science management is...!! Hopeless..!! Hungry for money ..!!

    ReplyDelete
  2. What the hell is going on??these peoples are not taking care of their self and others too...srticktly required lockdown in lonavala.

    ReplyDelete

Post Top Ad

Your Ad Spot

Pages