लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 16 July 2020

लोणावळा शहरात लॉकडाऊन संदर्भात कोणीही अफवा पसरवू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई - मुख्याधिकारी रवि पवार

लोणावळा शहरातील लॉकडाऊन संदर्भात मुख्याधिकारी रवि पवार काय म्हणाले हे बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
लोणावळा शहरात मागील काही दिवसात सातत्याने लॉकडाऊन संदर्भात व्हाट्सएप तसेच फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या जात आहे. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, तसेच अशा अफवा कोणीही पसरवू नये, अन्यथा अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात i येईल अशा स्पष्ट सूचना लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी रवि पवार यांनी आज दिल्या आहेत.

लोणावळा शहरात सध्या लॉकडाऊन ची आवश्यकता नाही आणि तसं प्रशासनाच्या वतीने यापूर्वीही स्पष्ट करण्यात आले आहे. जोवर मा.जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडून लॉकडाऊन संदर्भात काही आदेश प्राप्त होत नाही, तोवर कोणीही लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरवू नये असे आवाहन मुख्याधिकारी रवि पवार यांनी केलं आहे. याशिवाय लोणावळा शहरातील करोना बाधित रुग्णांची अधिकृत माहिती देताना मुख्याधिकारी यांनी शहरातील भाजीवाले, दूधवाले, पेपर टाकणारे, सर्व्हिस बॉय अशा सर्वांच्या रॅपिड टेस्ट करणार असल्याची माहिती देत या रॅपिड टेस्ट मध्ये जे पॉझिटिव्ह सापडतील त्या सर्वांच्या सरसकट कोविड-१९ टेस्ट केल्या जातील असं सांगितलं. याशिवाय पुढे बोलताना मुख्याधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्रा विषयी सविस्तर माहिती देताना कोणीही प्रतिबंधित क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करू नये अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages