लोणावळा येथील लव्हाळवाडी, पांगोळी येथील कोणार्क पॅरेडाईज या सोसायटीमधील एका दाम्पत्याचे करोना चाचणी अहवाल आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे आजच्या एका दिवसात लोणावळा शहरात आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या तीन झाली आहे तर शहरातील एकूण कोरना बधितांची संख्या आता २२ झाली आहे. याशिवाय इतर ५ जणांची नोंद ही नवी मुंबई याठिकाणी करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पतीचे वय ३२ तर पत्नीचे वय ३० आहे. आठवड्याभरापूर्वीच पत्नीची डिलिव्हरी झाली आहे. गुरुवारी १६ जुलै रोजी या दोघांचे करोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. आज प्राप्त झालेल्या अहवालात ते दोन्ही पतिपत्नी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. तसेच या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील ७ व्यक्तींचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment