लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 19 July 2020

लोणावळा शहरात २० जुलै पासून पुढील सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊन; किराणा आणि भाजीपाला दुकान २६ जुलैच्या मध्यरात्री पर्यंत बंद

करोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोणावळा शहरात सोमवारी मध्यरात्री २० जुलै पासून पुढील सहा दिवस म्हणजे रविवारी मध्यरात्री २६ जुलै पर्यंत संपूर्णतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून तसे आदेश मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आज रविवारी पारित केले आहे. यामुळे लोणावळेकरांना मंगळवारी सकाळ पासून रविवारी मध्यरात्री पर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय आपापल्या घराबाहेर पडता येणार नाही किंवा शहराबाहेरील कोणालाही या कालावधीत लोणावळा शहरात प्रवेश करता येणार नाही. विशेष म्हणजे दूध विक्रेते आणि औषध विक्रेते वगळता या संपूर्ण लॉकडाऊन कालखंडात कोणालाही सूट देण्यात आलेली नाही. 

लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवि पवार यांनी या लॉकडाऊन संदर्भात शनिवारी १८ जुलै रोजीच लोणावळेकरांना अवगत केलं होतं. लोणावळा शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये काय काय सुरू राहणार, कोणाकोणाला सूट मिळणार आणि कशा कशाला बंदी राहणार याची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे

🔴 स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व वाहणे वगळता अन्य व्यक्तींना नगरपरिषद क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून  बाहेर पडण्यास बंदी असेल

🔴 सर्व दुकानं, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर सर्व व्यवसाय करणारे व्यापारी दुकानं दि.२६ जुलै च्या मध्यरात्री पर्यंत संपूर्णतः बंद राहणार. तद्नंतर लॉकडाऊन वाढल्यास दि. २७ जुलै पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे दुकानं सुरू राहतील

🔴 दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरण अनुज्ञेय राहील

🔴 गॅस वितरण सेवा अनुज्ञेय राहील

🔴 पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत केवळ शासकीय वाहणे व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील

🔴 रुग्णालय, दवाखाने, औषध दुकानं, वैद्यकीय टेस्टिंग लॅब यांना वेळेचे बंधन असणार नाही

🔴 राष्ट्रीयीकृत व आरबीआय ने मान्यता दिलेल्या बँका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरू राहतील. बँकेच्या ग्राहक सेवा जसे ऑनलाईन एटीएम सुरू राहतील

🔴 औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील

🔴 शहरात परवाना असलेल्या उद्योगांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी आणि परतीसाठी परवानगी राहील. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळखपत्र सोबत ठेवणं बंधनकारक राहील. ज्या औद्योगिक अस्थापनेमध्ये कोविड-१९ चा रुग्ण आढळून येईल त्यामधील सर्व कामगारांची कोविड-१९ ची तपासणी स्वखर्चाने करणे बंधनकारक राहील. दरम्यानच्या कालावधीत उद्योग बंद ठेवण्यात यावा. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तीलाच फक्त कामावर उपस्थित राहता येईल

🔴 शेतमालाशी कृषी निगडित प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालू राहील

🔴 सर्व वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका यांना शहारांतर्गत वाहतुकीस परवानगी राहील

🔴 ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग, एचआयव्ही बाधित रुग्ण) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष १० पेक्षा कमी वयोगटातील मुलं यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाता येणार नाही.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages