लोणावळा येथील गवळीवाडा विभागात काल मंगळवारी करोना बाधित आढळून आलेल्या ६५ वर्षीय जेष्ठ महिलेचा आज बुधवारी मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गवळीवाडा विभागात मंगळवारी दोन जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच यातील महिलेची प्राणज्योत मावळली आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा
No comments:
Post a Comment