लोणावळा शहरात आज सोमवारी चार जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यापैकी लव्हाळवाडी, पांगोळी येथील कोणार्क पॅरेडाईज या सोसायटीमध्ये अजून दोन जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या सोसायटीमधील करोना बधितांची संख्या आता चार झाली आहे. याशिवाय आज गवळीवाडा विभागात अजून दोन जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तेथील रुग्ण संख्या आता चार झाली आहे. तर यामुळे लोणावळा शहरातील एकूण बधितांची संख्या आता ३५ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १७ जुलै रोजी कोणार्क पॅरेडाईज या सोसायटीमधील एका दाम्पत्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या ६ जणांचे हाय रिस्क म्हणून स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यातील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर अन्य ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यातील एक रुग्ण ६० वर्षीय आहे तर एक रुग्ण ३९ वर्षीय असून हे दोघेही या दाम्पत्याच्या नात्यातील आहे. याशिवाय गवळीवाडा विभागात आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. यातील महिला ही ६५ वर्षीय असून पुरुषाचे वय ५५ आहे. या सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लोणावळा शहरात सोमवार दिनांक २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण नोंद झालेल्या करोना बाधित रुग्णांची सांख्य ३५ झाली आहे.
लोणावळा शहरातील विभागनिहाय रुग्णांची संख्या
गवळीवाडा - ४
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४
भांगरवाडी - ९
नांगरगाव - ६
खंडाळा - ७
वलवण - २
गावठाण, लोणावळा - ३
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा
Thank you for the information you are providing.
ReplyDelete