लोणावळा येथील तुंगार्ली विभागातील ॐकार तरुण मंडळाच्या वतीनं लोणावळा नगरपरिषदेसाठी पाच पल्स ऑक्सिमिटर उपलब्ध करून देण्यात आले. ज्याचा उपयोग नगरपरिषदेच्या वतीनं करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची तपासणी करण्या करता करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या ॐकार तरुण मंडळाच्या वतीनं सातत्याने लोक कल्याणाच्या दृष्टीने विविध उपक्रम आयोजित केले जातात. यात वैद्यकीय, शैक्षणिक, स्वच्छता, आरोग्य आणि नैसर्गिक आपत्ती सारख्या क्षेत्रात काम करण्याचा मंडळाचा मोठा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या वनाटी,फणसराई येथील आदिवासी,कातकरी,ठाकर कुंठुबासाठी मंडळाकडुन अन्नधान्य, ब्लॅकेट व सोलर बॅटरीचे वाटप करण्यात आले होते.
लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी रवि पवार यांनी शहरातील सर्व गणेश मंडळाना अहवान केले होते की, गणेश मंडळातर्फे नगरपरिषदेस पल्स ऑक्सिमिटर उपलब्ध करून देण्यात आले तर नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांची तपासणी त्याद्वारे करता येईल. या आवाहनाला प्रतिसाद देत ॐकार तरुण मंडळा त्वरित पाच पल्स ऑक्सिमिटर मुख्याधिकारी रवि पवार यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी मंडळाचे मानद अध्यक्ष ज्ञानेश्वर येवले, नगरसेवक राजू बच्चे, निखिल कवीश्वर, जयंत गोसावी, अशोक साळवी, सतीश गावडे, किरण येवले, किशोर पवार, नितीन गायकवाड, हरीलाल बोरकर, धनंजय होनंगी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment