लोणावळा येथील नांगरगाव औद्योगिक वसाहती मधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणखी दोन जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे या कंपनीमधील करोना पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांची संख्या आता तीन झाली आहे. याशिवाय सदर कंपनीकडून कंपनीमध्ये काम करणाऱ्या इतर ९९ कामगारांची आज तपासणी करण्यात आली असून त्यातील ५ जणांचे स्वॅब संशयित म्हणून करोना तपासणी साठी घेण्यात आले आहे.
प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणारी एक व्यक्ती ७ जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर सदर कंपनी मधील या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकूण चार जणांचे स्वॅब हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या या दोघांमधील एक व्यक्ती कंपनी आवारातच राहण्यास असून दुसरी व्यक्ती नांगरगाव मध्ये राहण्यास आहे. नांगरगाव मध्ये राहणाऱ्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील तीन जणांचे स्वॅब हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून करोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण ८ जणांचे स्वॅब आज तपासणी साठी घेण्यात आले आहे.
लोणावळा शहरातील नांगरगाव येथे मागील काही काही दिवसांपासून सातत्याने करोना बाधित रुग्ण आढळून येते आहे. त्यात आज दोन रुग्णांची भर पडली असून नांगरगाव मधील एकूण रुग्णांची संख्या ९ झाली आहे तर लोणावळा शहरातील एकूण रुग्ण संख्या १६ झाली आहे. त्यात सध्या १२ रुग्ण हे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment