करोना बाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने बाधित झालेल्या डोंगरगाव वाडी येथील होमगार्ड आणि त्याच्या कुटुंबातील इतर तीनही जणांचा उपचाराअंती घेण्यात आलेल्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून या सर्वांना डिशचार्ज देऊन त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे.
जून महिन्यात २८ तारखेला लोणावळा ग्रामीण भागातील डोंगरगाव वाडी याठिकाणी राहण्यास असलेल्या एका होमगार्डचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील त्याचे आजी, आजोबा आणि त्याचे वडील अशा तिघांचे करोना अहवाल ३० जून रोजी पॉझिटिव्ह आले होते. तद्नंतर या चारही जणांवर कोविड केअर सेन्टर, तळेगाव येथे उपचार सुरू होते. या सर्वांचा रविवारी घेण्यात आलेल्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment