लोणावळ्यातील नामांकित धनलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे ज्वेलरी दुकानाचे मालकास फसवून तब्बल १ किलो वजनाची चांदी लंपास करणारा दुकानातील कारागीर रामेश्वर गणेशराव कुलथे (वय ३६ वर्षे, रा.वलवण, लोणावळा) यास अटक करण्यास लोणावळा शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले आहे. सदर आरोपी डिसेंबर २०१९ पासून फरार होता.
मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०१९ मध्ये धनलक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातील १ किलो वजनाची चांदीची पिंड पुण्याला जाऊन पॉलिश करून आणतो असे सांगून आरोपी रामेश्वर कुलथे पसार झाला होता. लोणावळा पोलिसांच्या गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाने गुप्त माहिती प्राप्त करून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीला जेरबंद केलं. या कारवाई मध्ये पो.नाईक वैभव सुरवसे, पो.कॉ. अजीज मेस्त्री, मनोज मोरे, पवन कराड, राजेंद्र मदने यांनी सहभाग घेतला होता. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment