लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 12 July 2020

मावळात करोनाचा कहर; एकाच दिवसात २८ जण करोना पॉझिटिव्ह

मावळ तालुक्यात आज रविवार चा दिवस करोनाचा कहर माजवणारा दिवस ठरला आहे. आज तालुक्यात विविध ठिकाणी तब्बल २८ जण करोना बाधित आढळून आले आहे. त्यातील १६ रुग्ण हे एकट्या सुदुंबरे गावात मिळून आले आहे. 

मावळ तालुका हा करोना चा हॉटस्पॉट बनू लागला असल्याचं चित्र निर्माण झाले असून त्यातही प्रामुख्याने ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता निर्माण करणारा ठरत आहे. आज आढळून आलेल्या २८ रुग्णांपैकी २५ रुग्ण हे ग्रामीण भागातील असून ३ रुग्ण शहरी भागातील आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये इंदोरी येथे १, सुदुंबरे येथे १६, कान्हेफाटा येथे ४, कामशेत येथे १, साई येथे २, शिंदे वस्ती तळेगाव येथे १, लोणावळा येथे १ ते वडगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

मावळ तालुक्यात आज अखेर करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२० झाली असून यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८३ असून, ८८ जण रुग्णालयात तर ४० जण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहे. याशिवाय ९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.


10 comments:

  1. लॉक डाऊन कडक व्हायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. घरी रहा,सुरक्षित रहा,

    ReplyDelete
  3. Lonavala should also locked down, many outsiders (specially mumbaikars) coming to lonavala, and these visitors here not serious @ social distancing and precautionary majors for this pandemic situation. Local authorities ignoring conveniently and also not seems serious.

    ReplyDelete
  4. yes otherwise non red zones will become redzones... strict lockdown required

    ReplyDelete
  5. Sticky lockdown required and need to follow everyone

    ReplyDelete
  6. Lonavala (LMC)required more awareness for Corona..!

    ReplyDelete

Post Top Ad

Your Ad Spot

Pages