लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 14 June 2020

ओळकाईवाडी, कुसगाव बुद्रुक येथे एका डॉक्टरला करोनाची लागण

लोणावळा शहरालगत असलेल्या ओळकाईवाडी, कुसगाव बुद्रुक याठिकाणी एक ५० वर्षीय डॉक्टरला करोनाची लागण झाली असून कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक ३ मध्ये मायक्रोकंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित करोनाग्रस्त व्यक्ती ही पाच जून रोजी आजारी असल्या कारणाने पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र त्या व्यक्तीमध्ये करोनाची लक्षण दिसून आल्याने १२ जून रोजी त्यांचे स्वॅब नमुने करोनाच्या चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्या चाचणीचा अहवाल रविवारी संध्याकाळी प्राप्त झाला असून, संबंधित व्यक्ती करोना बाधित असल्याच निदान झालं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर दोन व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणी साठी घेण्यात आले आहे. त्याचबरोबर कुसगाव मधील प्रभाग ३ मध्ये कंटेन्मेंट आणि उर्वरित भाग तसेच ओळकाईवाडी परिसरात बफरझोन लागू करण्यात आला आहे.



2 comments:

Post Top Ad

Your Ad Spot

Pages