३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाची गावाला मोठा तडाखा बसला. या चक्रीवादळात आपलं घर गमावून बसलेल्या राजमाची मधील वन समिती कर्मचाऱ्याला सावरण्यासाठी मदत करीत वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत देऊ केली.
निसर्ग या चक्रीवादळात राजमाची आणि परिसरातील फणसराई, वनाटी तसेच वळवंडे (उदेवाडी) याठिकाणी अपरिमित अशी हानी झाली. अनेक घर जमीनदोस्त झाली. याच जमीनदोस्त झालेल्या घरांच्या यादीत राजमाची वन समिती साठी राजमाची येथे येणाऱ्या पर्यटकांकडून टोल जमा करण्याचे काम करणारा कर्मचारी गणेश राजाराम उंबरे याच्या घराचाही समावेश आहे. वन समिती कडून मिळणाऱ्या अत्यंत तुटपुंज्या वेतनात संपूर्णतः पडझड झालेलं घर सावरणे गणेश उंबरे याला अशक्य असल्याने वनखात्याचे अधिकारी सुधाकर गीते, मयुरी धायगुडे आणि संदीप रामगुडे यांनी २० हजार रुपयांची मदत गणेश उंबरे याला देऊ केली. यावेळी राजमाची गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाणिरे हे देखील उपस्थित होते.

No comments:
Post a Comment