लोणावळा शहरात आज बुधवारी दुपारपर्यंतच ३० कोरोना बधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी सोमवारी घेण्यात आलेल्या काही जणांच्या स्वॅबचे अहवाल अद्यापी येणं बाकी आहे. त्यामुळे ही संख्या अजून वाढून उच्चांकी पातळीवर जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १७ जणांचे अहवाल हे खाजगी लॅब मार्फत प्राप्त झाले असून, उर्वरीत १३ जणांचे अहवाल हे कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन चाचणीद्वारे प्राप्त झाले आहे. या सर्व प्राप्त अहवालामध्ये खंडाळा येथील ७, जुना खंडाळा येथील ३, भांगरवाडी येथील ४, नांगरगाव येथील ४, गवळीवाडा येथील ४, तुंगार्ली येथील ३, लाल टाकी रायवूड येथील १, जुना बाजार येथील १, हुडको येथील १ आणि रेल्वे कॉलनी येथील २ अशा एकूण ३० जणांचा समावेश आहे. याशिवाय कोरोना वर मात केलेल्या ६ जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लोणावळा शहरात आतापर्यंत कोरोना बधितांची एकूण संख्या ३३९ झाली आहे तर आतापर्यंत १४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या १४ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या १७९ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment