लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 5 September 2020

लोणावळा शहरात १८ कोरोना पॉझिटिव्ह; एक मृत्यू

लोणावळा शहरात आज शनिवारी विविध विभागातून एकूण १८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याशिवाय लोणावळा शहरातील एका जेष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये भांगरवाडी विभागातील ८, गवळीवाडा विभागातील २, खंडाळा विभागातील २, जुना खंडाळा विभागातील २, नांगरगाव विभागातील १, तुंगार्ली विभागातील १, वलवण विभागातील १, सिद्धार्थ नगर विभागातील १ अशा एकूण १८ जणांचा समावेश आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या ४२१ झाली आहे तर आतापर्यंत कोरोना वर मात केलेल्या १८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या १८ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या २१८ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०७)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages