लोणावळा शहरात आज बुधवारी २३ नवे रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. या २३ रुग्णांच्या व्यतिरिक्त मागील दोन दिवसात लोणावळा नगरपरिषदेस खाजगी लॅब द्वारे इतर १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. हे सर्व ३५ रुग्ण मिळून लोणावळा शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५५४ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागात ७, नांगरगाव विभागात ५, खंडाळा विभागात ३, बाजारपेठ विभागात २, वलवण विभागात २, ठोंबरेवाडी विभागात २ तसेच स्वराज्य नगर आणि सिद्धार्थ नगर विभागात प्रत्येकी १ अशा एकूण २३ जणांचा समावेश आहे.
या २३ जणांच्या व्यतिरिक्त आणखी जे १२ रुग्ण मागील दोन दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत त्यात भांगरवाडी विभागातील ४, गवळीवाडा विभागातील ४, हनुमान टेकडी येथील २, द्वारकामाई 'जी' वॉर्ड आणि खंडाळा विभागातील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे.
लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५४ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या २२७ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २० झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३०७ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर ८ )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment