लोणावळा शहरात आज सलग दुसर्या दिवशी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. झालावाडी कोविड सेंटर येथे सध्या 18 रुग्ण उपचार घेत आहेत. तर शहरात आज अखेर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 222 इतकी आहे.
लोणावळा शहरात आज अखेरपर्यंत 1420 कोरोना रुग्ण मिळून आले असून त्यापैकी 1147 रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. तर कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या 51 झाली आहे.
लोणावळा शहराची वाटचाल सध्या कोरोना मुक्तीकडे सुरू आहे ही शहरातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची वार्ता आहे. भविष्यात शहरात कोरोनाचे रुग्ण सापडू नयेत याकरिता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने झालावाडी कोविड सेंटर याठिकाणी मोफत कोरोना अँन्टीजन तपासणी दररोज केली जाते. शहरातील कोणत्याही नागरिकाला थंडी, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, तोंडाला चव न लागणे, वास न येणे असे आजार जाणवत असल्यास त्यांनी तात्काळ झालावाडी याठिकाणी कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच चेहर्यावर मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये, दसरा दिवाळी हे सण फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साजरा करत कोरोनारुपी रावणाचा विनाश करण्यासाठी सतर्क रहा असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 10 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment