लोणावळा शहरात आज शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे घटस्थापनेचा आजचा दिवस लोणावळा शहरासाठी दिलासा देणारा असा ठरला आहे.
लोणावळा शहरातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३८५ इतकी झाली असून यापैकी आतापर्यंत १०७५ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २५७ इतकी आहे. याशिवाय कोरोना मुळे मृत झालेल्यांची संख्या ४९ इतकी आहे.
लोणावळा शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी नगरपरिषदेने माझा लोणावळा माझी जबाबदारी ही मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये नागरिकांची मोफत कोरोना तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जर कोणाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये मोफत तपासणी करून विलगीकरण कक्षात रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 10 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment