लोणावळा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तसेच लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लोणावळा नगरपालिका रुग्णालयाच्या वतीने ८ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
लोणावळ्याच्या उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कोरोना काळात ज्यांनी उत्कृष्ट कामं केले आहे त्या सर्वांचा कोरोना योध्दा पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका संध्या खंडेलवाल, डॉ. निधी टाटीया, नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ घरडे, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, शुभम मानकामे, संध्या हिले, आशासेविका, रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व सर्व सभासद उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यात प्रामुख्याने महिला पोलिस ट्रेनिंग सेंटर खंडाळा येथील महिला प्रशिक्षणार्थींसह, शिवदुर्ग मित्रचे सदस्य तसेच लोणावळ्यातील नागरिकांना सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौरभ घरडे, लॅब टेक्निशियन संध्या हिले, हर्षल होगले व लोणावळा नगरपालिका रुग्णालयातील सर्व कर्मचारी व सभासद यांनी आयोजन केले होते.

No comments:
Post a Comment