लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 1 April 2021

लोणावळा शहरात आज गुरुवारी तब्बल ३० करोना रुग्ण

लोणावळा : लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळुन येण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आज काल बुधवारी ३५ रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवारी पुन्हा एकदा शहरात तब्बल ३० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागात ५, जी वॉर्ड विभागात ६, खंडाळा विभागात ५, तुंगार्ली विभागात ६, न्यू तुंगार्ली, गावठाण व नांगरगाव विभागात प्रत्येकी २, पंगोळी आणि गवळीवाडा विभागात प्रत्येकी १ तर असे एकूण ३० जणांचा समावेश आहे.

शहरात रोज वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव या वारंवार करीत आहे. याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आज दिनांक ०१ एप्रिल पासून शाळा क्रमांक १ या ठिकाणी ७० बेडची सुविधा असलेलं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून उद्या संख्येश्वर रुग्णालयात कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा जाधव यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages