लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 11 February 2022

चेंबरची लोखंडी पट्टी ठरतेय वाहतुकीसाठी धोकादायक

चेंबरची लोखंडी पट्टी ठरतेय वाहतुकीसाठी धोकादायक

लोणावळा : येथील संख्येश्वर हॉस्पिटल जवळील पंडित नेहरू मार्गामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या चेंबरची एक लोखंडी पट्टी उचकटून निघालेली असून ती या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. वेळीच ही पट्टी काढली गेली नाही तर याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. 

लोणावळा शहरातील डॉ. रानडे दवाखाना ते इंद्रायणी पुलाच्या दरम्यान असलेला रास्ता भुयारी गटर योजनेसाठी खोदण्यात आला होता. भुयारी गटरचे काम करीत असताना या रस्त्याच्या मध्यभागी गटरसाठी आवश्यक चेंबर टाकण्यात आले आहे. भुयारी गटरचे काम पूर्ण झाले असले तरीही रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यातच रस्त्यावर टाकण्यात आलेल्या चेंबरच्या झाकणांची आतापासूनच दुरवस्था होऊ लागली आहे.  या मार्गवर संख्येश्वर हॉस्पिटल जवळ एका चेंबरच्या झाकणाची लोखंडी पट्टी धोकादायक रित्या निघालेली असून अपघातास निमंत्रक ठरत आहे. प्रशासनाने तात्काळ या झाकणाची दुरुस्ती करून ही पट्टी बाजूला करावी अशी मागणी नागरिक करीत आहे. सोबतच या रस्त्याचे काम सुद्दा लवकरात लवकर पूर्ण करावे अशीही मागणी करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages