लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 23 February 2022

नगरपरिषद प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता

नगरपरिषद प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता

लोणावळा : महाराष्ट्रातील मे 2020 ते मार्च 2022 दरम्यान मुदत संपलेल्या व संपत असलेल्या 'अ' वर्गातील 16, 'ब' वर्गातील 68 व 'क' वर्गातील 120 तर नवनिर्मित 4 अशा एकूण 208 नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा संपूर्ण एक महिन्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. यामुळे पुढील एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी निवडणुका ह्या दोन सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने आरक्षण सोडतीची प्रक्रिया मागे ठेवत प्रभाग रचना पूर्ण करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. 

प्रभाग रचना कार्यक्रम :-

1) बुधवार दिनांक 02/03/2022 पर्यंत मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (नगर परिषदांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) सादर करणे. 

2) सोमवार दिनांक 07/03/2022  पर्यंत जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे.

3) गुरुवार दिनांक 10/03/2022 पर्यंत प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे ( अधिसूचना कलम १० नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे.

4) गुरुवार दिनांक 10/03/2022 ते 17/03/2022 या कालावधीत हरकती व सूचना मागविणे.

5) प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी यांनी मंगळवार दिनांक 22/03/2022 पर्यंत सुनावणी देणे.

6) जिल्हाधिकारी यांनी शुक्रवार दिनांक 25/03/2022 पर्यत
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे अहवाल पाठविणे.

7) राज्य निवडणूक आयुक्त यांनी शुक्रवार दिनांक 01/04/2022 पर्यत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे. 

8) जिल्हाधिकारी यांनी मंगळवार दिनांक 05/04/2022 पर्यंत अंतिम प्रभाग रचना अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे. 

एकूणच अंतिम प्रभाग रचना अधिसूचना 05 एप्रिल पर्यंत जाहीर होणार असल्याने लगेचच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास लोणावळा, तळेगाव या नगरपरिषदांसह अन्य सर्व 208 नगरपरिषदांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागू शकतात. आणि ही शक्यता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार आणि पक्षांनी आपापल्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages