शेतात लागलेल्या वणव्याने आदिवासी कुटुंबाची राखरांगोळी
मावळ तालुक्यातील पाटण गावात शेतात लागलेलेल्या वणव्यामुळे पेट घेत एका आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला आग लागून झोपडी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून अक्षरशः या कुटंबाची राख रांगोळी झाली आहे
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हे उघड्यावर आलेले आदिवासी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
हातावर पोट असलेले लक्ष्मण सोनू वाघमारे असे घर जळून खाक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार लक्ष्मण वाघमारे व त्याचा परिवार सकाळी मोलमजुरीसाठी घराबाहेर पडले. दुपारच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आहे. झोपडीतील भांडी, कपडे, अन्न धान्य तसेच त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड ही सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने हे आदिवासी वाघमारे कुटुंब उध्वस्त होऊन रस्त्यावर आले आहे.

No comments:
Post a Comment