लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर कर्मचारी हा भोसरी येथे रहात असल्याने त्याची नोंद पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत घेण्यात आलेली आहे.
सदर पोलीस कर्मचाऱ्याला करोना सारखी लक्षणे जाणवली होती मत्यामुळे लोणावळा नगरपालिका आरोग्य केंद्रात १७ जुन रोजी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर हा कर्मचारी विश्रांतीसाठी रविवारी २१ जून पासून त्याच्या घरीच म्हणजे भोसरी येथे राहिला होता. सदर कर्मचाऱ्याने गुरुवारी २५ जून रोजी एका खाजगी लॅब मार्फत तपासणी करून घेतली असता आज शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या सदर कर्मचाऱ्यावर आरोग्य केंद्र ,भोसरी येथे उपचार सुरू आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील मावळ तालुक्यातील इतर पाच व्यक्तींचे नमुने कोव्हिड केअर सेन्टर, तळेगाव दाभाडे येथे घेण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment