लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 26 June 2020

लोणावळा शहरात महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

लोणावळा शहरातील पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनी याठिकाणी राहणाऱ्या एक ५७ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोर्टर चाळ विभाग प्रतिबंधित क्षेत्र तर लगतची भाजी मंडई तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हा बफर झोन जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर करोनाबाधित महिलेला बुधवारी २४ जून रोजी संध्याकाळी श्वसनास व इतर त्रास होऊ लागला. त्यामुळे या महिलेला तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी करोना तपासणीसाठी या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. आज शुक्रवारी आलेल्या तपासणी अहवालात ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सदर महिलेला अगोदरपासूनच यकृताचा आजार असून सध्या या महिलेची प्रकृती अत्यवस्थ आहे. या महिलेच्या संपर्कात असलेल्या एकूण ७ जणांना कोविड केअर सेंटर, तळेगाव दाभाडे येथे क्वारंटाईन करण्यात आले असून, उद्या त्या सर्वांचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages