लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 23 June 2020

लोणावळ्यातील नौदल प्रशिक्षण संस्थेतील करोना बधितांची संख्या अकरा

लोणावळा शहरात असलेल्या आय.एन.एस. शिवाजी या नौदल प्रशिक्षण केंद्रामधील करोना बाधित झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या संख्येत मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी याठिकाणी अजून चार नव्या प्रशिक्षणार्थी कॅडेट्स तरुणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली असून मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्णांविषयी शहरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या करोना चाचणी अहवालात आय.एन.एस. शिवाजी नौदल प्रशिक्षण संस्थेमधील चार प्रशिक्षणार्थींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील करोना बधितांची संख्या सात वरून वाढून अकरा झाली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार लोणावळ्यातील आय.एन.एस. शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्रात याच महिन्यात काही कॅडेट्स नौदल प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. त्यानंतर या सर्वांना आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्येच क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र यातील काही तरुणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील वानवडी येथील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० जून रोजी तीन, २१ जून रोजी एक, २२ जून रोजी तीन तर मंगळवारी २३ जून रोजी चार प्रशिक्षणार्थी कॅडेट्सचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages